64 वर्षाच्या प्राध्यापकाचा 27 वर्षीय विद्यार्थीनीवर जडला जीव
मुलीने आपल्या प्राध्यापक नवऱ्यासह घटनास्थळाहून पळ काढला. मात्र, 64 वर्षीय प्राध्यापक आणि 27 वर्षीय विद्यार्थीनीच्या या लग्नाचा भर रस्त्यात चाललेला हा हायव्होल्टेज ड्रामा शहरात चर्चेचा विषय बनला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुटुंबीयांनी आरोप केलेले सर्व आरोप मुलीने फेटाळून लावले आहेत. कुटुंबीय नेहमी त्रास देत होते आणि कोणत्याही गोष्टीचं स्वातंत्र्य नव्हतं त्यामुळं आपण वय न पाहता लग्न केलं, असं मुलीने सांगितलं आहे.
मुलीने केवळ पैशांसाठी आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या प्राध्यापकाशी लग्न केलं आहे. या लग्नाला केवळ शारीरीक संबंध जबाबदार आहेत, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी प्राध्यापकाला भर रस्त्यात मारायला सुरुवात केली. मात्र मुलीने आपल्या प्राध्यापक नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तरीही कुटुंबीय आपला बदला घेतच राहिले. त्यानंतर मुलीच्या एक वर्ग मैत्रीणीने प्राध्यापकाला वाचवण्यासाठी हस्तक्षेप केला.
कुटुंबीयांना लग्नाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी प्राध्यापकाचा बदला घेण्याचा विचार केला. प्राध्यापक आणि त्यांची विद्यार्थीनी लग्नाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी नोंदणी कार्यालयात गेले तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांना बदला घेण्याची संधी मिळाली.
जोधपूर शहरातील ही घटना आहे. मुलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध असतानाही दोघांनी घरी न सांगता लग्न केलं. मात्र दोन महिन्यानंतर ही बातमी मुलीच्या कुटुंबीयांना समजली.
कॉलेज लाईफमध्ये तरुण-तरुणींच्या प्रेमाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण प्राध्यापक आणि विद्यार्थीनी यांच्या प्रेमाबद्दल कधी ऐकलं नसेल. प्राध्यापक आणि विद्यार्थीनी या दोघांचाही एकमेकांवर जीव जडला. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण मुलीच्या घरी जेव्हा ही बातमी समजली तेव्हा या प्रेम कहाणीमध्ये खरं ट्वीस्ट आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -