बिबट्यावर झडप घालून आईनं पोटच्या गोळ्याला वाचवलं!
या थरारक प्रसंगानंतर प्रमिला यांनी प्रणयला उचलून पाड्यावर आणले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. लहानग्या प्रणयच्या पाठीवर बिबट्याच्या दातांमुळे जखमा झाल्या आहेत, तर गुडघ्यालाही मार बसला आहे. रुग्णालयात उपचार करुन प्रणयला घरी सोडण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिबट्याच्या जबड्यातून प्रणयला सोडवण्याआधी प्रमिला यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, इतक्या रात्री मदत मिळणं शक्य नव्हतं. प्रमिला यांनी लेकराला वाचवण्यासाठी बिबट्यावर झडप घातल्याने, बिबट्याही भाबावला. त्यामुळे प्रणयला तिथेच टाकून पळून गेला.
बिबट्याच्या झडपेनंतर प्रणय ओरडू लागला, त्यावेळी प्रमिला यांना प्रकार लक्षात आला. बिबट्या प्रणयला ओढत नेतोय, हे पाहिल्यावर प्रमिला यांनी प्रसंगावधान दाखवून अंगातील सारं धाडस एकवटलं आणि बिबट्यावर झडप घालत प्रणयला सोडवलं.
आरे वसाहतीतील चाफ्याच्या पाड्यावर प्रमिला रिंजाड या रात्री घराबाहेर गेल्या असताना, त्यांचा 3 वर्षीय मुलगा प्रणयही त्यांच्या मागोमाग गेला. आपल्या मागे प्रणय येतो आहे, याची कल्पना प्रमिला यांना नव्हती. त्या घराजवळील जंगलात झुडुपात शिरल्या, त्यावेळी प्रणयही तिथे पोहोचला. त्याचवेळी अंधारत दबा धरुन बसलेल्या बिबट्याने प्रणयवर झडप घातली.
आरे वसहतीतल्या चाफ्याच्या पाड्यावर बिबट्याच्या तावडीतून पोटच्या लेकराला सोडवण्याची थरारक घटना घडली. आईने आपल्या तीन वर्षीय लेकराला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेत आपल्या लेकराला वाचवण्यासाठी मातेने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि साहसाचं सर्वच स्तरातून कौतुक आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -