बॉलिवूडच्या 'या' जोड्या यावर्षी विवाह बंधनात अडकणार
आदित्य रॉय कपूर आणि दीवा धवन एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. या दोघांचाही यावर्षी विवाह होण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांची जोडीही चर्चेत आहे. प्रियंका आणि निक यांनी 18 ऑगस्ट रोजी भारतीय पद्धतीने रोका (साखरपुडा) केला. या वर्षअखेर प्रियंका आणि निक दोघं लगीनगाठ बांधणार आहेत.
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या अफेअरची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होती. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दोघांनी आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. रणवीर-दीपिका 14 आणि 15 नोव्हेंबरला विवाह बंधनात अडकणार आहेत.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशीप बाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. रणबीर-आलिया हे अनेकदा एकत्र दिसत आहेत. दोघे यावर्षी विवाह बंधनात अडकण्याची शक्यत वर्तवली जात आहे.
गायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली ही जोडी आता सर्वांच्या परिचयाची बनली आहे. दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि हे जगजाहीर आहे. त्यामुळे ही जोडीही यावर्षी लग्न करू शकते.
अली फझल आणि रिचा चढ्ढा यांनी आपल्या रिलेशनशिपची घोषणा 2017 च्या अखेरीस केली होती. त्यामुळे हे दोघेही यावर्षी लगीनगाठ बांधण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -