या बॉलिवूड स्टार्सचा ग्रॅज्युएशनपूर्वीच शिक्षणाला राम-राम
बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री दीपिका पादूकोणने बंगळुरुच्या माऊंट कारमेल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र मॉडलिंगची तयारी करत असल्यामुळे शिक्षण सोडावं लागलं. त्यानंतर दीपिकाने शॉर्ट टर्म कोर्ससाठी प्रवेश घेतला, मात्र वेळेअभावी हा कोर्सही अपूर्ण राहिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदबंग सलमान खानने वांद्रेच्या नॅशनल कॉलेजमधून शिक्षणाची सुरुवात केली. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर शिक्षण अर्ध्यातच सोडलं.
करिना कपूर मिठीबाई महाविद्यालयात शिकत असताना तिचं वकिल बनण्याचं स्वप्न होतं. मात्र रिफ्यूजी सिनेमातून दमदार ब्रेक मिळाल्यामुळे करिनाचं शिक्षण अपूर्ण राहिलं.
खास स्टाईलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूरचं केवळ बारावी पर्यंत शिक्षण झालं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत माहिती दिली होती. ग्रॅज्युएशन पूर्ण न झाल्याची खंतही तिने बोलून दाखवली होती.
या वर्षात बॉक्स ऑफिसवर चार सिनेमांनी 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. यामध्ये अक्षय कुमारचेच तीन सिनेमे आहेत. शिवाय 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा अक्षयचा हा सहावा सिनेमा आहे.
विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने 1994 साली मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला. आर्किटेक्ट बनण्याचं स्वप्न असतानाही बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर शिक्षण पूर्ण करता आलं नाही.
'प्रेम कैदी' सिनेमात संधी मिळाल्यानंतर करिष्मा कपूरने वयाच्या 16 व्या वर्षी शिक्षण सोडलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -