PHOTO : अजय देवगनची मुलगी न्यासाचा आज 17वा वाढदिवस; पाहा खास फोटो
(सर्व फोटो- सोशल मीडिया)
न्यासा अजय देवगन आणि काजोलची पहिली मुलगी न्यासा असून त्यांना अजून एक नऊ वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव युग आहे.
बॉलिवूड स्टार्सने ट्वीट करत या अफवांना उत्तर दिलं होतं की, 'मला विचारल्याबद्दल धन्यवाद! काजोल आणि न्यासा ठिक आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत पसरलेली माहिती खोटी आहे.'
काही दिवसांपूर्वी अजय देवगनने अफवा दूर करण्यासाठी एक ट्वीट केलं होतं. अफवांमध्ये लिहिलं होतं की, अजय देवगनची पत्नी काजोल आणि मुलगी न्यासा यांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.'
अजयच्या फेसबुक पोस्टवर कमेंट करत एका फॅनने लिहिलं आहे की, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा न्यासा. तू तुझ्या ग्रेट वडिलांप्रमाणे मोठं बनलं पाहिजे. तुझे वडिल इंडस्ट्रिमधील सर्वात प्रतिभाशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत.'
अजयच्या शेवटच्या ओळीवरून न्यासा आपल्या उच्च शिक्षणासाठी विदेशात असल्याचं समजत आहे.
अजयने न्यासासोबत आपला एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुला आजच्या दिवसासाठी आणि आयुष्यभरासाठी शुभेच्छा. घरीच राहा, सुरक्षित राहा.'
त्यामुळे सोमवार सकाळपासूनच ट्विटरवर न्यासा ट्रेडिंग टॉपिक्समध्ये आहे.
त्यानंतर अजय आणि काजोलच्या चाहत्यांनीही न्यासावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने सोशल मीडियावर आपली मुलगी न्यासाला 17व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.