'चला हवा...'च्या थुकरटवाडीत अवतरलेले बॉलिवूड स्टार
बॉलिवूडलाही चला हवा येऊ द्या ची भुरळ पडली असून नुकतीच सुपरस्टार सलमान खानने हजेरी लावली. सुलतान चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सलमानने सेटवर हजेरी लावली होती.
एक अलबेला चित्रपटातून मराठीत पदार्पण करणारी अभिनेत्री विद्या बालननेही या सिनेमाच्या प्रमोशनसाठी थुकरटवाडीत हजेरी लावली होती
शाहरुख खान थुकरटवाडीमध्ये अवतरला होता.
फॅन चित्रपटाच्या शूटिंगसाठी शाहरुखने चला हवा येऊ द्याच्या सेटवर हजेरी लावली
रॉकी हँडसम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठमोळा दिग्दर्शक निशीकांत कामत सोबत जॉन अब्राहमही या कार्यक्रमात आला होता.
‘चला हवा येऊ द्या’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
सोनम कपूर ही थुकरटवाडीत अवतरणारी पहिली बॉलिवूड कलाकार ठरली.
नीरजा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनम आणि संगीतकार शेखर रावजिवानी यांनी चला हवा येऊ द्या मध्ये हजेरी लावली आणि बॉलिवूडला या कार्यक्रमाची कवाडं खुली झाली.