रणवीर, रणबीर, आलिया, एकता....बॉलिवडू स्टार्स मोदींच्या भेटीला
कलाकारांच्या या चमूमध्ये अभिनेता विकी कौशलही होता. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित विकीचा 'उरी' चित्रपट आज प्रदर्शत झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो वरुण धवनने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही मोदींसोबतचा फोटो शेअर केला आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टीलाही पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
'जादू की झप्पी', आपल्या महान देशाच्या पंतप्रधानांना भेटणं ही सन्मानाची बाब आहे, असं कॅप्शन रणवीर सिंहने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे.
या भेटीवेळी मोदींसोबत काढलेला सेल्फी सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. अभिनेता रणवीर सिंहने क्लिक केलेला हा सेल्फी सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
मनोरंजनाच्या माध्यमातून चांगल्या समाज आणि राष्ट्राची निर्मिती करण्यात सिनेउद्योगाचं असलेलं योगदान, या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कलाकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मनोरंजन विश्वासाठी जीएसटीत केलेल्या बदलांसाठीही यावेळी कलाकारांनी मोदींचे आभार मानले.
या बैठकीला रवाना होण्याआधी अभिनेता आयुषमान खुरानाने विमानतळावरील सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी दिल्लीत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.बॉलिवूडमधील ताज्या दमाच्या कलाकारांपैकी कोण या फोटोमध्ये नाही, असा प्रश्न पडतो.
बैठकीनंतर बॉलिवूडचा निर्माता दिग्दर्शक करण जोहरने मोदींसोबत शेकहॅण्ड करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.