नव्वदीच्या 'या' टॉप अभिनेत्रींना आता ओळखणंही कठिण; पाहा कशा दिसतात

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मीनाक्षी शेषाद्रि आपल्या क्लासी अभिनयासोबतच आपल्या डान्ससाठीही ओळखली जाते. मीनाक्षीने हिंदी, तमिळ आणि तेलगु यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 56 वर्षीय अभिनेत्री सध्या इंडस्ट्रीपासून दूर आहे. मीनाक्षी सध्या आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. मीनाक्षी शेषाद्रिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'पेंटर बाबू' या चित्रपटाने केली. परंतु, तिला खरी ओळख मिळाली 'हीरो' चित्रपटामुळे. मीनाक्षीचा लूक एवढा बदलला आहे की, तिला पाहून ओळखणंही कठिण आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. माधिरी दीक्षित सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. माधिरी टिव्ही शोज आणि चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. 53 वर्षांची माधुरी आपल्या फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असते. ती आपल्या वर्कआउटचे व्हिडीओ सोशल मीडियावर फॅन्ससोबत शेअर करत असते. माधुरीने चित्रपट 'अबोध'मधून बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला होता. परंतु, तिला खरी ओळख 'तेजाब' (1988) चित्रपटातून मिळाली.
अभिनेत्री फराह नाजने बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फराहने 1985मध्ये यश चोप्रा बॅनरच्या 'फासले' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. परंतु, बॉलिवूडमध्ये जम बसल्यानंतर सर्व काही सुरळीत सुरु असताना फराहने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर फराहने चित्रपटांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. फराहने बिंदू दारा सिंहनंतर अभिनेता सुमीत सहगलशी लग्न केलं. 51 वर्षीय अभिनेत्री सध्या मुंबईत आपला पती आणि मुलासोबत राहते. फराह अभिनेत्री तब्बू हिची मोठी बहिण आहे. तिने आपल्या काळातील सर्वत टॉप अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.
रवीना टंडन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करून नेहमीच फॅन्ससोबत कनेक्ट राहते. रवीना टंडन म्हणजे, 90च्या दशकातील एक नामांकीत अभिनेत्री. रवीनाने 1992मध्ये आलेल्या 'पत्थर के फूल' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 90च्या दशकातील काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांना आपल्या उत्कृष्ट अभिनयाने दर्शकांच्या मनात वेगळी जागा तयार केली आहे. या सुंदर अभिनेत्रींपैकी काही आज लाइमलाइटपासून दूर आहेत. एवढचं नाहीतर या अभिनेत्रींचा लूकही आधीपेक्षा बराच बदलला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, त्या अभिनेत्रींबाबत ज्यांनी आपल्या सौंदर्याने सर्व चाहत्यांना घायाळ केलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -