नियमित अंडी खाण्याचे फायदे
अंड्यांचे सेवन आरोग्यास फायदेशीर असते. पण उष्ण प्रकृतीच्या लोकांनी प्रमाणात अंडी खाणे आवश्यक आहे.
अंडी खाल्याने नखं आणि केसांना फायदा होतो.
अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
नियमित अंडी खाल्याने हाडं बळकट होतात.
रोज तीन अंडी खाल्याने दृष्टी सुधारते.
अंडी खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज 3 अंडी खाल्ल्याने आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात.
शरीरातील विटामिन्सची कमतरता अंड्यांच्या सेवनामुळे कमी होते.
गर्भवतींनी अंडी खाल्याने भ्रूणाची चांगली वाढ होते.
रोज अंडी खाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते.
अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो.
अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते.
डाएट करणाऱ्यांसाठी अंडी खाणे फायदेशीर असते.
रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा यासारखे आजार सतावत असतात. अंडी खाल्ल्याने हे आजार दूर होतात.
अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात.