काबूलमध्ये भारतीय दूतावासाजवळ स्फोट
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2017 12:16 PM (IST)
1
याच परिसरात अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचं निवासस्थानही आहे. स्फोटामुळे 100 मीटर अंतरावर असलेल्या घरांचं नुकसान झालं आहे.
2
सुत्रांच्या माहितीनुसार, ईराणी दूतावासाला लक्ष्य करुन हा स्फोट घडवून आणला. मात्र अजून कोणीही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
3
सुदैवाने भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
4
या स्फोटामुळे भारतीय दूतावासाच्या इमारतीचं थोडं नुकसान झालं आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहे.
5
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीय दूतावासांजवळ आज सकाळी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. स्फोटानंतर विदेश दूतावास परिसरात सुरक्षा आणखी कडेकोट केली आहे.