नाना पटोलेंनंतर भाजप आमदार आशिष देशमुखही बंडाच्या तयारीत?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक राज्य सरकारला चौफेर घेरण्याचा प्रयत्नात आहे. त्यातच सत्ताधारी भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनीच या पत्राद्वारे सरकारला अडचणीत आणलं आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या अडचणी वाढणार आहेत.
राज्य सरकार केवळ शहरी विकासाकडे लक्ष देत आहे. ग्रामीण जनता आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करत आशिष देशमुख यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्प रोखून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशीही मागणी आशिष देशमुख यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.
नागपूर मेट्रो, स्मार्ट सिटी, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पामुळे जनतेचा फायदाच होणार आहे. या प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होत आहेत. मात्र या कामासाठी लागणारा पैसा लहान उद्योगांना सबसिडी म्हणून दिला असता तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती, असं मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
आशिष देशमुख यांनी 6 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आणि त्याविषयीची गरज या सात पानांच्या पत्रात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
फडणवीस सरकारने गेली तीन वर्षे प्रयत्न करूनही राज्यातील लोकजीवनात काही परिणामकारक बदल झालेला नाही. शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा - सुव्यवस्था अधिक बिघडली आहे, नागपूर क्राइम कॅपिटल बनलं, असं आशिष देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानांचं पत्र लिहिलं आहे, ज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी ही रास्त असल्याचं म्हटलं आहे.
नागपूर : खासदार नाना पटोले यांच्यानंतर आता नागपूरमधील काटोल मतदारसंघाचे भाजप आमदार आशिष देशमुखही बंडाच्या पवित्र्यात आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -