भाजपचा पहिला फॉर्म्युला
ज्या पक्षाचा आमदार त्या मतदारसंघात त्या पक्षाला जास्त जागा सोडण्याचं सूत्र भाजपकडून पुढे केलं जाणार आहे. हा फॉर्म्युला 60:40 किंवा 80:20 ठरू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिकेच्या युतीसाठी पहिल्या फॉर्म्युल्यात भाजपनं 115 जागांवर दावा केल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे.
भाजपच्या या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 115 तर शिवसेनेच्या वाट्याला 112 जागा येत आहेत.
एका मतदारसंघात 6 ते 7 वॉर्ड पकडल्यास, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आमदार असलेल्या पक्षाला 4 जागा मिळतील आणि 2 जागा आमदार नसलेल्या.
विधानसभेच्या आधारावर आमदारांची संख्या पाहता मुंबई महापालिका निवडणुकीत 50:50 फॉर्म्युला असावा, असा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे एकूण 227 जगांपैकी 115 जागेचा प्रस्ताव आज भाजपकडून येण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -