Birthday Special | विजय देवरकोंडा आपल्या फॅन्सना 'रावडी' का बोलतो?
अभिनेता विजय देवरकोंडाचा जन्म तेलुगू कुटुंबात झाला. त्याचे वडील देवरकोंडा गोवर्धन रावही अभिनेते आहेत. छोट्या पडद्यावर त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत.
त्याचा अर्जुन रेड्डी हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरहिट सिनेमांपैकी आहे. या सिनेमाचा हिंदी रिमेकही बनवण्यात आला होता, ज्याचं नाव कबीर सिंह होतं. या सिनेमात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत झळकला होता.
सोबत तो फूड डिलिव्री अॅप झोमॅटोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडरही आहे. विजय देवरकोंडाची ही सामाजिक संस्थाही चालवतो, जी बेरोजगार तरुणांना काम आणि प्रशिक्षण देते
विजय देवरकोंडा अभिनेत्यासोबत आता निर्माताही बनला आहे. त्याच्या कंपनीचं नाव हिल एन्टरटेन्मेंट आहे. 2019 मध्ये देवरकोंडाने 'मीकू मथरम चेप्ठा' या चित्रपटाची निर्मिती केली होती. याशिवाय त्याचा एक क्लोथिंग ब्रॅण्डही आहे, ज्याचं नाव 'रावडी वेअर' आहे. विजयने यंदाच हा ब्रॅण्ड लॉन्च केला आहे.
विजय देवरकोंडाने 2011 मध्ये 'नुव्विला' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. सुरुवातीच्या दिवसात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी त्याच्याकडे पैशांची चणचण असायची.
विजय लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत दिसेल.
विजय देवरकोंडाने नोटा, डियर कॉम्रेड, मेहनती आणि वर्ल्ड फेसम लव्हर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
आता मात्र विजय देवरकोंडा दक्षिणेतील मोठा स्टार बनला आहे. अर्जुन रेड्डी चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
अर्जुन रेड्डी सिनेमाद्वारे लोकप्रियतेचं शिखर गाठलेला दाक्षिणेतील अभिनेता विजय देवरकोंडा याचा आज 31वा वाढदिवस आहे. केवळ दक्षिणेतच नाही संपूर्ण देशभर त्याचे चाहते आहेत.
विजय देवरकोंडाला घरात 'रावडी' म्हटलं जातं. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, तो लहानपणापासूनच सडेतोड आणि फटकळ आहे. त्यामुळे कुटुंबीय त्याला 'रावडी' म्हणतात. त्यामुळे विजय आपल्या चाहत्यांनाही रावडी बोलतो.