Birthday Special | 23 वर्षांची झाली मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर; लवकरच करणार बॉलिवूड डेब्यू
मानुषी छिल्लर लवकरच मोठ्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. यशराज बॅनरचा चित्रपट 'पृथ्वीराज'मधून ती बॉलिवूडमध्ये पदाप्रण करणार आहे. या चित्रपटात ती संयोगिताची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत अक्षय कुमारही दिसून येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमानुषीचे वडिल डॉक्टर मित्रा बासु छिल्लर भारताच्या सुरक्षा अनुसंधान आणि विकास संघटनांमध्ये वैज्ञानिक भूमिकांमध्ये कार्यरत आहेत. तर तिची आई नीलम इंस्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अॅन्ड एलाइड सायन्सेस न्युरोकेमेस्ट्री विभागाची प्रुमख आहे.
मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वी 2000 मध्ये प्रियांका चोप्राने हा किताब पटकावला होता. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषी अनेक इव्हेंट्समध्ये सहभागी झाली होती.
मिस इंडिया स्पर्धेआधी मानुषीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं. हा किताब जिंकल्यानंतर तिने मेडिकल कॉलेजमधून एक वर्षासाठी ब्रेक घेतला होता.
मानुषीचा जन्म हरियाणातील रोहतक जिल्ह्यात झाला होता. त्यानंतर तिचं कुटुंब हरियाणातून दिल्लीला शिफ्ट झालं. मानुषीने दिल्लीतील सेंट थॉमस शाळेमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं.
मानुषीचा हा फोटो मिस वर्ल्ड होण्याच्या आधीचा आहे. त्यावेळी शिक्षण घेत होती.
2017 रोजी मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केलं होतं. विश्व सुंदरी असलेली मानुषी छिल्लर आज आपला 23 वा वाढदिवस साजरा करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -