बर्थ डे स्पेशल : आलिया भटबाबतच्या रंजक गोष्टी
आलिया भटला हवाई प्रवासाची भीती वाटते. विमान प्रवासाच्या वेळी ती कायम नर्व्हस होते.
चांगली झोप हेच सौंदर्याचं रहस्य असल्याचं आलिया सांगते. मी सकाळी लवकर उठते, असंही आलियाचं म्हणणं आहे.
सिनेमांशिवाय आलिया ‘पिटा’साठी काम करते. अभिनय आणि गाण्याशिवाय आलियाला पेंटिंगचाही छंद आहे. तिला चारकोल पेंटिंग करायला आवडतं.
आलिया आणि वडील महेश भट यांचं नातं बाप-लेकीपेक्षा मित्र-मैत्रिणीसारखं आहे. पण ती आईच्याही तेवढीच जवळ आहे. मोठ्या पडद्यावर आईसोबत काम करण्याची तिची इच्छा आहे.
आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं अफेअर सुरु असल्याची जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. नुकतंच दोघांनी एका मॅग्झिनसाठी हॉट फोटोशूट केलं होतं. 'स्टूडंट ऑफ द इयर'पासून आलिया आणि सिद्धार्थ एकमेकांच्या जवळ आले.
‘स्टूडंट ऑफ द इयर’ आलियाचा पहिला चित्रपट नव्हता. 1999 मध्ये आलेल्या 'संघर्ष' सिनेमात तिने प्रिती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तेव्हा ती फक्त 6 वर्षांची होती.
पण इतर मुलींप्रमाणे आलियाला वडिलांसारखा नवरा नको. कारण तिच्या वडिलांचं आयुष्य कायम वादात राहिलं आहे. शिवाय महेश भट यांची अनेक अफेअर्स होती. त्यामुळे खुश ठेवेल आणि चांगला मित्र असेल, असा मुलगा आलियाला नवरा म्हणून हवा आहे.
अभिनेता इम्रान हाश्मी आणि दिग्दर्शक मोहित सूरी आलियाचे भाऊ आहेत.
आलिया भट चित्रपटसृष्टीतली सगळ्यांची लाडकी आहे. ती करीना कपूरची चाहती आहे. तर कतरिना कैफ तिची बेस्ट फ्रेण्ड आहे. दोघी सोबत जिममध्येही जातात.
‘स्टूडंट ऑफ द इयर’साठी आलियाने तीन महिन्यात सुमारे 16 किलो वजन कमी केलं होतं. त्यावेळी तिचं वजन सुमार 67 किलो होतं. या सिनेमासाठी आलियासह सुमारे 500 मुलींनी ऑडिशन दिलं होतं. त्यानंतर आलियाची सिनेमासाठी निवड झाली.
आलियाने सुरुवातीचं शिक्षण मुंबईतील जमुनाबाई नर्सरी स्कूलमध्ये केली होती. अभ्यासात आलिया फार हुशार नव्हती. पण इतर अक्टिव्हिटीजमध्ये ती नेहमीच पुढे असायची. मग ते डान्स असो वा गाणं.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा आज 25 वा वाढदिवस आहे. महेश भट आणि सोनी राजदान यांच्या घरात 15 मार्च, 1993 रोजी मुंबईत आलियाचा जन्म झाला होता.