✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मालिश ते बूट पॉलिश, नंदकिशोर सर्व शक्तीमान, तुमच्यासमोर झुकवतो मान

एबीपी माझा वेब टीम   |  20 Jun 2018 12:15 PM (IST)
1

हुकूमशाह नंदकिशोरने स्पर्धकांना उड्या मारायला लावल्या. चालायला लावलं. इतकंच नाही तर पुष्कर जोगला स्वत:च्या पायातील बूट काढून, ते पॉलिश करायला सांगितलं. पुष्कर जोगने हुकूमशाहचे बूट स्वत:च्या शर्टने पॉलिश केला.

2

हुकूमशाहाच्या नाड्या हातात येताच नंदकिशोरने अनेक फर्मान सोडले. खरं तर टास्क सुरु होण्यापूर्वीच नंदकिशोरने कॅमेरासमोर आगपाखड केली होती. सई लाडावलेली असून घरात राहण्यास अपात्र आहे, मेघाने सात लाख रुपयांचे कपडे खरेदी केले, पुष्करला बाहेर माठ अॅक्टर म्हटलं जातं, असे आरोप त्याने केले.

3

या आठवड्यात मेघा, आस्ताद, रेशम, स्मिता, शर्मिष्ठा, नंदकिशोर हे सहा स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. मात्र व्होटिंग लाईन्स बंद असल्यामुळे येत्या रविवारी कोणी स्पर्धक घराबाहेर जाणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

4

नंदकिशोर चौगुले स्पर्धकांना काहीही करायला सांगत आहेत. बूट पॉलिश करण्यापासून ते पाय धुण्यापर्यंत, चहा बनवण्यापासून ते मसाज करण्यापर्यंत अशी कोणतीही कामं हुकूमशाह नंदकिशोर चौगुले बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना सांगत आहे.

5

ईला त्याने आपली वैयक्तिक नृत्यांगना म्हणून नेमलं, तर शर्मिष्ठाला आपले हात-पाय चेपण्याची आज्ञा सोडली. शर्मिष्ठाने परपुरुषाला हात लावण्याविषयी संकोच व्यक्त केला, त्याचप्रमाणे जॅकेट घालण्याचीही परवानगी मागितली, मात्र तिला आदेश शिरसावंद्य मानण्याचं फर्मान नंदकिशोरने सोडलं.

6

हुकूमशाहासाठी जनतेने 'नंदकिशोर सर्व शक्तिमान, तुमच्यासमोर झुकवतो मान' हा जयघोषही तयार केला आहे. सर्व स्पर्धकांना गुडघे टेकून त्याच्यासमोर बसावं लागतं, आणि त्याच्या आदेशाचं पालन करावं लागतं. नंदकिशोरने आस्ताद काळेला आपला रक्षक नेमला आहे, तर स्मिता गोंदकरसुद्धा त्याची सेविका आहे.

7

बिग बॉसने नंदकिशोरला बहाल केलेल्या हुकूमशाहाच्या पदामुळे त्याला विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. मंगळवारच्या भागात बिग बॉसने 'हुकूमशाह' हे साप्ताहिक कार्य स्पर्धकांना दिलं आहे. यामध्ये नंदकिशोर हुकूमशाह आहे, तर इतर सर्व स्पर्धक त्याची जनता आहेत. हुकूमशाह देईल तो आदेश मान्य करणं जनतेला क्रमप्राप्त आहे.

8

नंंदकिशोरने सर्वांना आपल्यासमोर मान वाकवून अनेक वेळा स्वतःच्या नावाचा जयघोष करायला लावला, तसंच लॉनमध्ये चालता-चालता उड्या मारण्यासही भाग पाडलं. इतकंच काय, तर खाणं, पाणी पिणं आणि वॉशरुम वापरणं यासाठीही नंदकिशोरची परवानगी घ्यावी लागत आहे. प्रत्येक स्पर्धकाकडून त्यांच्या आवडीची वस्तू करस्वरुपात घेऊन त्यांना खाण्या-पिण्याची संमती दिली जात आहे. आऊंना होणारा दम्याचा त्रास आणि वयोमान यामुळे त्यांना काही बाबतीत सूट देण्यात आली आहे.

9

'मराठी बिग बॉस'च्या घरातला सध्याचा आठवडा 'हुकूमशाही' स्वरुपाचा आहे. नव्या टास्कनुसार बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आलेला स्पर्धक नंदकिशोर चौगुले हे हुकूमशाह झाले आहेत.

10

नंदकिशोर चौगुलेने चक्क मेघा धाडेला बुटावर नाक घासायला लावलं. महिलांविषयी नंदकिशोरच्या वर्तनामुळे प्रेक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे बिग बॉसचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही आपल्याला शरम वाटत असल्याचं ट्वीट केलं आहे. हे ट्वीट बिग बॉस संपल्यानंतर म्हणजे ठीक रात्री 11 वाजता करण्यात आलं आहे. त्यामुळे मांजरेकरांनी नंदकिशोरच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मालिश ते बूट पॉलिश, नंदकिशोर सर्व शक्तीमान, तुमच्यासमोर झुकवतो मान
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.