आकाशने शिल्पाला जबरदस्ती किस केलं, चाहते संतापले
शिल्पाचे चाहतेही आकाश ददलानीवर भडकले आहेत. आकाशला बाहेर काढा अशी मागणी चाहते करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआकाशच्या या हरकतीमुळे घरातील सदस्यच नाही तर घराबाहेर असलेले मागील सीझनचे स्पर्धकही खवळले आहेत.
शिल्पा शिंदेच्या फॅन क्लबने ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सुरुवातीला शिल्पा आणि पुनीश गप्पा मारताना दिसत आहेत. मग आकाश तिथे येतो आणि जबरदस्तीने शिल्पाच्या ओठांवर किस करतो. यानंतर शिल्पा त्याच्यावर चिडते. माझ्यापासून दूर राहायचं आणि असं पुन्हा केल्यास थोबाडीत मारेन, असं शिल्पा बोलते.
आकाश ददलानीने मागील एपिसोडमध्ये शिल्पासोबत बोलता बोलता तिला जबरदस्तीने किस केलं, हा शिल्पासाठी मोठा धक्का होता. महत्त्वाचं म्हणजे यासाठी आकाशने शिल्पाची माफीही मागितली नाही.
बिग बॉसच्या या सीझनमधला आतापर्यंतचा सर्वात मोठा वाद समोर आला आहे. हा वाद आकाश ददलानी आणि शिल्पा शिंदे यांच्यामधील आहे. खरंतर घरात कायम भांडण करणाऱ्या आकाशने यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
बिंदू दारा सिंहने आकाशविरोधात भलामोठा ट्वीट करुन संताप व्यक्त केला आहे. बिंदू दारा सिंह म्हणाला की, व्होटिंग लाईन बंद झालीय हे आकाशला माहित नाही. बाहेर जाण्याआधी आकाश एखादा मोठा वाद करणारच हे मी आधीच सांगितलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -