पंढरपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेला तुफान गर्दी
त्यांनी दुष्काळ, राम मंदिर, कांदा प्रश्न, राफेल घोटाळा, पीकविमासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार फटकारे ओढले.
पंढरपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेला राज्यभरातून कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. (सर्व छायाचित्रे : राजेश वराडकर )
ज्यांनी माझ्या जनतेचं वाकडं केलं त्यांचं आम्ही वाकडं करणार, असा इशाराच देताना युती करायची की नाही हे जनता ठरवेल, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पंढरपुरातील सभेला राज्यभरातून कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.
यावेळी आदित्य ठाकरे, मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
जागावाटप खड्ड्यात गेलं, आधी शेतकऱ्यांचं बघा, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरातील सभेत दिला
उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरातील सभेत दुष्काळ, राम मंदिर, कांदा प्रश्न, राफेल घोटाळा, पीकविमासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार फटकारे ओढले.
मला सत्ता नसली तरी चालेल, मात्र इथला शेतकरी सुखी राहायला हवा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.