सलमानच्या चमच्यांनी माझं म्हणणं खरं ठरवलं: सोना मोहापात्रा
सलमानच्या चाहत्यांच्या अशा ट्वीटनंतर सोनानं त्यांनाही उत्तर दिलं आहे. भाईंच्या चमच्यांनो तुमच्या प्रत्येक अतिशय घाणेरड्या कमेंटने मी म्हटलेली प्रत्येक गोष्ट खरी असल्याचं स्पष्ट झालं आहे.'
तिच्या ट्विटनंतर सलमानच्या चाहत्यांनी ट्विटरवर तिला ट्रॉल करण्यास सुरुवात केली आणि तिच्याबाबत अपशब्द वापरण्यास सुरुवात केली.
गायिका सोना मोहापात्रा ट्वीट केल्यानंतर सलमानचे चाहते तिच्यावर चांगलेच भडकले.
सलमानच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोना मोहापात्राने ट्वीट केलं की' बायकांना मारहाण, लोकांना चिरडणं, जनावरांची हत्या करणं... तरीही तो (सलमान) देशाचा हिरो. हे बरोबर नाही. भारतात असा वेड्या चाहत्यांची कमी नाही.
सलमानविरोधात ट्विट केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी गायिका सोना मोहापात्राला ट्विटरवर बरंच हैराण केलं आहे. सलामाननं बलात्कारसंबंधी वक्तव्य केल्यानं सोना मोहापात्रानं ट्विटरवरुन त्याच्यावर टिका केली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी तिला बरंच ट्रॉल केलं.
नुकतंच सलमान खानला सुल्तान सिनेमच्या शुटींगबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावर बोलताना सलमाननं शुटींगनंतर येणारा थकवा हा एखाद्या बलात्कारी तरुणीच्या वेदनेइतका असल्याचं म्हटलं होतं.