भगवानबाबांच्या स्मारकाच्या बांधकामास सुरुवात
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2018 09:50 PM (IST)
1
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते भगवानबाबांच्या जयंतीदिनी या स्मारकाचे भूमिपूजन झालं.
2
या स्मारकाचं बांधकाम आता सुरू झालं आहे.
3
गोपीनाथ मुंडे यांचा जनसेवेचा वसा पुढे सुरु ठेवणार असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रीतम मुंडे यांनी केलं.
4
भगवानबाबांच्या स्मारकाचा खर्च सरकारकडून न घेता सर्व खर्च गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहे.
5
त्यावेळी मेळाव्यात भगवानबाबांचे सावरगाव येथे भव्य-दिव्य स्मारक उभारण्याची घोषणा त्यांनी केली होती.
6
गेल्यावर्षी भगवानगडावर दसरा मेळावा न घेता आल्यामुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा सावरगाव घाट येथे घेतला होता.
7
बीड तालुक्यातील सावरगाव घाट येथे भगवान बाबांच्या जन्मभूमीत भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.
= 7">