हरारे सामन्यातील काही खास क्षण
पहिलाच वन डे खेळणारा के. एल. राहुलने पदार्पणातच शतक झळकावलं. राहुलने 115 चेंडूत 100 धावा ठोकल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल आणि अंबाती रायडु यांच्यातील शानदार भागीदारीमुळे भारताने 9 विकेट्स राखून विजय मिळवला. ( सर्व फोटो सौजन्यः एपी फोटो/स्वंगीराई मुक्वाझी)
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात काल झालेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मात्र या सामन्यात लक्ष वेधून घेणारे अनेक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.
अंबाती रायडु झेल घेताना.
भारतीय खेळाडूंनी कालच्या सामन्यात क्षेत्ररक्षणातही आपली चुणूक दाखवली.
धवल कुलकर्णीने 10 षट्कांत 42 धावा देत 2 बळी घेतले.
झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लब स्टेडिअमवर भारतीय प्रेक्षकांनी देखील गर्दी केली होती.
जसप्रित बुमराहने गोलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या 4 फलंदाजांना परत पाठवलं.
झिम्बाब्वेचा फलंदाज तेंदाय छतारा आऊट झाल्यानंतर पव्हेलियनमध्ये जाताना.
कर्णधार धोनी युवा खेळाडूंसोबत खेळताना उत्साहात दिसत होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -