✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कमी शिक्षणातही चांगले जॉब.... बक्कळ कमाई!

एबीपी माझा वेब टीम   |  08 Aug 2016 11:39 AM (IST)
1

बेरोजगारी ही भारतातील आजच्या घडीला सर्वात मोठी समस्या आहे. देशातील अनेक सुशिक्षित तरुणही नोकरी मिळत नसल्याने घरी बसून असतात. मात्र, आम्ही आज तुम्हाला असे चार जॉब सांगणार आहोत, ज्यांच्यासाठी तुम्हाला उच्चशिक्षण घेण्याचीही गरज नाही. तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नसलं, तरी तुम्हाला या जॉबमधून पैसा कमवता येईल.

2

रेडिओ जॉकी आणि व्हिडीओ जॉकी – तुमच्या क्रिएटिव्हिटीवर आधारित जॉब म्हणजे रेडिओ जॉकी आणि व्हिडीओ जॉकी. या जॉबसाठी तुम्हाला कोणत्याही विशेष कोर्सची आवश्यकता नसते. मात्र, प्रोफेशनल ट्रेनिंग करावी लागते. ही ट्रेनिंगही फार अवघड असते, अशातला भाग नाही. तुमचा आवाज स्पष्ट असणं आवश्यक आहे आणि भाषेवर चांगली पकड असली पाहिजे. यामधून तुम्ही महिन्याकाठी किमान 35 ते 40 हजार रुपये कमवू शकता.

3

फिटनेस ट्रेनर – देशातील फूड कल्चर मोठ्या प्रमाणात बदलतो आहे. यामुळे अनेकदा लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांनाही तोंड द्यावं लागतं. त्यामुळे फिट राहण्यासाठी अनेकजण फिटनेस ट्रेनरची मदत घ्यावी लागते. या क्षेत्रात फिटनेसचं चांगलं ज्ञान आवश्यक आहे. मात्र, या फिल्डमध्ये कोणत्याही विशिष्ट शिक्षणाची गरज नसते. या प्रोफेशनमधून तुम्ही महिन्याला सुमारे 60 ते 70 हजार रुपये कमाई करु शकता.

4

इव्हेंट मॅनेजमेंट – गेल्या काही वर्षांपासून इव्हेंट मॅनेजमेंटकडे प्रोफेशन म्हणून पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटसाठी तुम्हाला कोणती डिग्री-डिप्लोमाची आवश्यकता नाही. मात्र, इव्हेंट मॅनेजमेंटची बेसिक माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. शिवाय, पार्टी वगैरे अटेन्ड करणं तुम्हाला आवडत असेल, तर हे प्रोफेशन तुमच्यासाठी आणखी सोपं ठरेल. या प्रोफेशनच्या माध्यमातून तुम्ही महिन्याकाठी सुमारे 40 ते 50 हजार रुपये कमवू शकता.

5

बीपीओ – इंग्रजी आणि हिंदी भाषांवर तुमचं चांगलं प्रभुत्त्व असेल, तर तुम्हील बीपीओमध्ये चांगले पैसे कमवू शकता. विशेष म्हणजे बीपीओसाठी ग्रॅज्युएशनचीही गरज नाही. तुम्ही बारावीनंतरही बीपीओमध्ये काम करु शकता. यामध्ये तुम्ही महिन्याकाठी 35 ते 40 हजार रुपये कमवू शकता.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कमी शिक्षणातही चांगले जॉब.... बक्कळ कमाई!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.