खूब भालो! बंगाली फूड फेस्टमध्ये खाद्यपदार्थांचा खजिना
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबंगाली फूड फेस्टची खासियत म्हणजे इथे लाईव्ह काऊण्टरही आहे. बंगाली रोल काऊण्टरवर तुम्हाला फ्रँकीसारखा पदार्थ खायला मिळेल.
बंगाली मास्टरशेफच्या हाताची चव लाभलेलं अस्सल बंगाली फूड तुम्हाला इथे चाखायला मिळणार आहे. विशेष म्हणजे रेस्टॉरंटचं इंटिरिअरही बंगाली थीममध्ये साकारण्यात आलं आहे.
झालमुरी... अर्थातच बंगाली पद्धतीची भेळ. टेबलवर बसल्या ठिकाणी बंगाली बाबू तुम्हाला ही चटपटीत झालमुरी तयार करुन देतात.
आपली भारतीय खाद्यसंस्कृती विविधरंगी आहे. महाराष्ट्रीय, उत्तर भारतीय जेवणाप्रमाणे बंगाली खानाखजिनाही तितकाच साग्रसंगीत आहे. मासे, चिकन-मटणाच्या डिशेसपासून बंगाली स्वीट्स जिभेला चटक लावतात.
कोशा मांगशो हा मटणाचा चविष्ट पदार्थही या फूड फेस्टिव्हलमध्ये तुमच्या दिमतीला आहे
माछेर चॉप, मटण कटलेट यासारखे तोंडी लावण्याचे पदार्थ तुम्हाला चाखायला मिळतील
बंगाली पदार्थांचा महत्त्वाचा भाग म्हणजे बंगाली स्वीट्स.. इथे तुम्हाला प्रसिद्ध सोंदेश खाता येणार आहे.
रोशोगुल्ला खरं तर तुम्ही मुंबईतही सहज चाखू शकता. मात्र इथे मिळणारा भरगच्च रोशोगुल्ला तुम्हाला 'भालो!' म्हणायला लावेलच
मासा म्हणजे बंगाली माणसांचा जीव की प्राण. ग्रीन गेव्हीमधला बंगाली पद्धतीचा फिश तुम्ही खाल्ला नाहीत, तर काय केलंत?
पुचका काऊण्टरवर तुम्हाला बंगाली पद्धतीची पाणीपुरी खायला मिळेल. आंबट-गोड-तिखट अशा चवी एकाच वेळी तुमच्या जिभेवर रेंगाळतील, याची शाश्वती आहे.
बंगाली खाद्यसंस्कृती मुंबईकर खवय्यांना खाऊ घालण्यासाठी अंधेरीतील कोहिनूर काँटिनेंटलने बंगाली फूड फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. रविवार 17 जूनपर्यंत सॉलिटेअर रेस्टॉरंटमध्ये हा खाद्य महोत्सव सुरु राहणार आहे.
दालचिनी आणि वेलचीच्या ग्रेव्हीमध्ये तयार करण्यात आलेलं 'मुर्गीर झोल' म्हणजेच चिकन तुम्हाला इथे खाता येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -