बीडची महिला 21व्या बाळाला जन्म देणार, पहिल्यांदाच रुग्णालयात प्रसुती होणार!
विशेष म्हणजे लंकाबाई यांची याआधीची 20 बाळंतपणं घरीच झाली आहे, मात्र एकविसावी प्रसुती पहिल्यांदाच रुग्णालयात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलंकाबाईच्या चार मुली आणि एका मुलाचा विवाह झालेला आहे. त्यांचीही 3, 4 आणि 5 अशी अपत्य आहेत. आता एकविसाव्या बाळंतपणासाठी लंकाबाई तयार आहेत.
गेल्या वर्षीच एका मुलाचा जन्म झाला होता, परंतु तो लगचेच दगावला आणि आता पुन्हा गरोदर. म्हणजे 18 महिन्यात त्यांना दोनदा लेकरं होतात.
माजलगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केसापुरी कॅम्प परिसरात मालोजी देविदास खरात हे पाल ठोकून मागील 12-15 वर्षापासून वास्तव्यास आहेत. मालोजी यांची पत्नी लंकाबाई ही 21व्या वेळेस गरोदर असल्याचा प्रकार समोर आला. आहे.
विशेष म्हणजे लंकाबाई खरात यांची आशा स्वयंसेविकेने रजिस्टर नोंद घेतली आहे. पण त्यांची अद्याप सोनोग्राफी झालेली नाही. गरोदर मातेचं कार्डही त्यांना मिळालेलं नाही, की तिचं लसीकरण झालं नाही.
त्यांच्या 9 मुली आणि 2 मुले सध्या जिवंत आहेत. तर त्यांच्या 5 मुलं आणि 3 मुलींचा बाळंतपणानंतर मृत्यू झाला. आतापर्यंत त्या कधीही शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात बाळांतपणासाठी दाखल झालेल्या नाहीत.
बीडमध्ये काही दिवसांपूर्वी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात मिरा एखंडे या महिलेचा बाळासह आठव्यांदा बाळांतपणावेळी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा याच माजलगाव शहरात एक महिला एकविसाव्यांदा गरोदर असल्याचं समोर आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -