तारकर्ली ते नैनीताल... हा भारत तुम्ही पाहिला आहे का?
तारकर्ली: महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्लीचा समुद्र किनारा सुट्टीच्या दिवसात नेहमीच पर्यटकांना खुणावतो. अतिशय नयनरम्य अशा या समुद्र किनाऱ्याचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी एकदातरी या ठिकाणाला नक्की भेट दिली पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकच्छ: गुजरातमधील कच्छच्या वाळवंटाचे सौंदर्य आणि त्याची भव्यता पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
नैनीताल: उत्तराखंडमधील नैनीताल तर नेहमीच पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असते. नैनीतालमधील डोंगरामधून वाट काढणारे झरे, नद्या पर्यटकांना नेहमीच खेचून घेतात.
मुन्नार: दक्षिण भारताच्या केरळमधील हिरव्यागार वनराईची चादर ओढलेल्या डोंगरांच्या कुशीत वसलेलं मुन्नार हे ठिकाण. मुन्नारचे निसर्ग सौंदर्य पाहून तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.
लडाख: लडाखच्या रस्त्यांवरुन प्रवास करताना घाटांमधील वळणांमुळे तुम्हाला चित्तथरारक अनुभव मिळेल हे नक्की.
सुट्टीच्या दिवसात अनेकजण परदेशातील विविध ठिकाणच्या पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे बेत आखतात. यामध्ये ते खर्चाची बिलकुल पर्वा करत नाहीत. पण परदेशातील पर्यटन स्थळाप्रमाणेच भारतातही अशी काही ठिकाणे आहेत, जी पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भारतातील ठिकाणांची माहिती देणार आहोत, ज्याने येथील निसर्ग सौंदर्य पाहून तुम्हाला यूरोप सफरीचा नक्की आनंद मिळेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -