✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

रायुडू, अय्यर, पृथ्वी शॉ, भारतीय संघात कोण कोण स्थान मिळवणार?

एबीपी माझा वेब टीम   |  08 May 2018 08:53 AM (IST)
1

आज बीसीसीआय भारताच्या 6 संघांसाठी खेळाडूंची निवड करणार आहे. यामध्ये अफगाणिस्तानविरुद्धची 1 कसोटी, इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघ, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज अ विरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघ, आयर्लंडविरुद्ध टी 20 संघ, इंग्लंड दौऱ्यासाठी टी 20 संघ, इंग्लंडविरुद्ध वन डे संघ, तर इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नंतर भारतीय संघ निवडण्यात येणार आहे.

2

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी कौंटी क्रिकेट खेळण्याचा घेतलेला निर्णय श्रेयस अय्यरच्या पथ्यावर पडण्याची चिन्हं आहेत. कारण अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतलेल्या विराट कोहलीच्या जागी, दिल्ली डेयरडेव्हिल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची निवड होण्याची शक्यता आहे.

3

दरम्यान, विराटच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात येईल.

4

विविध क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघाची आज निवड होणार आहे. भारताचे 6 संघ आज निवडले जाणार आहेत. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर निवड समितीचं लक्ष आहे.

5

भारत आणि अफगाणिस्तान संघांमधला एकमेव कसोटी सामना 14 ते 18 जून या कालावधीत बंगळुरुत होणार आहे. याच कालावधीत विराट कोहली कौंटी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. त्यामुळं त्यानं अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. विराटच्या अनुपस्थितीत मुंबईच्या श्रेयस अय्यरला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.

6

आयर्लंडविरुद्धच्या टी ट्वेण्टी सामन्यात रोहित शर्माकडे भारतीय संघाचं कर्णधारपद असेल.

7

भारताच्या अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या टीमचा कर्णधार पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि शिवम मावी यांना भारताच्या अ संघात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित आहे. इतकंच नाही तर भारतीय कसोटी संघातील 7 वरीष्ठ खेळाडूही इंग्लंड ए विरुद्धच्या सामन्यात भारताच्या अ संघात सहभागी होतील.

8

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी कोहलीच्या जागी अय्यरला स्थान मिळेल. तर रवींद्र जाडेजाऐवजी अक्षर पटेलचा समावेश केला जाईल. याशिवाय ऑलराऊंडर हार्दिक पंड्यालाही अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीतून वगळलं जाऊ शकतं. त्याच्या जागी विजय शंकरला स्थान मिळू शकतं.

9

आयर्लंडविरुद्धच्या दोन टी 20 सामन्यांसाठीही आज भारतीय संघाची निवड होणार आहे. आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अंबाती रायुडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे या मालिकेसाठी त्याची निवड होऊ शकते.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • रायुडू, अय्यर, पृथ्वी शॉ, भारतीय संघात कोण कोण स्थान मिळवणार?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.