न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच टीम इंडिया विश्वविक्रम रचणार!
वेस्ट इंडिजचा सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो. विंडिजने आतापर्यंत 571 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 164 विजय, 179 पराभव आणि 173 अनिर्णित, अशी कामगिरी आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेने या निमित्ताने भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या सर्व कर्णधारांना निमंत्रित करुन सन्मान करण्याचं नियोजन केलं आहे.
टीम इंडिया 22 सप्टेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघ मैदानात उतरताच नवा विक्रम नावावर करणार आहे.
या सोहळ्यासाठी सुनिल गावस्कर, अनिल कुंबळे, महेंद्र सिंह धोनी, सचिन तेंडुलकर सौरव गांगुली, कपिल देव, रवी शास्त्री, राहुल द्रविड, के. श्रीकांत यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
कसोटी खेळणाऱ्या 10 संघांपैकी टीम इंडिया 500 कसोटी खेळणारी चौथी टीम होणार आहे. आतापर्यंत टीम इंडियाने 499 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 129 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 157 कसोटींमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यापैकी 212 सामने अनिर्णित आहेत.
सर्वाधिक कसोटी खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने आतापर्यंत 976 कसोटी खेळल्या असून 350 सामन्यात विजय मिळवला आहे. 284 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तर 342 सामने अनिर्णित राहिले.
इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 791 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 372 विजय, 211 पराभव आणि 206 सामने अनिर्णित राहिले आहेत.