नक्षल्यांना धूळ चारण्यासाठी CRPF ची रणरागिणी सज्ज
बस्तरमधील लोक अत्यंत गरीब आणि साधे आहेत. त्यांचा विकास होऊ शकला नही. त्यामुळे इथे काम करावसं वाटलं, असं उषा किरण यांनी नियुक्तीवर बोलताना सांगितले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबढती म्हणून वरिष्ठांनी उषा किरण यांच्यापुढे तीन पर्याय ठेवले होते. मात्र, उषा किरण यांनी नक्षली भागात जाण्याचा निर्णय घेतला.
उषा किरण या मूळच्या गुरुग्राममधील राहणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे ट्रिपल जंपमध्ये सुवर्णपदकही त्यांच्या नावावर आहे.
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील नक्षल प्रभावित क्षेत्रात महिला कमांडंटची नियुक्ती करण्यात आली आहे. उषा किरण असं तिचं नाव आहे.
अतिशय निर्भयतेनं काम करणाऱ्या उषा किरण यांचे आजोबा आणि वडीलसुद्धा सीआरपीएफमध्ये कार्यरत होते.
नक्षलग्रस्त भागात पहिल्यांदाच एका महिला कमांडंटची नियुक्त करण्यात आली असून, उषा किरण यांची सीआरपीएफच्या 80 व्या बटालियनमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून नेमणूक झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -