इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गुलाबी चादर
हिंदी भाषेत 'बसंत रानी' अशी ओळख असणाऱ्या या झाडाचे वनस्पतीय शास्त्रीय नाव 'टॅब्यूबिया पेंटाफायला' (Tabebuia Pentaphylla / Tabebuia Rosea) असं आहे. तर याच झाडाला इंग्रजीमध्ये 'पिंक ट्रंम्पेट, पिंक पाऊल, पिंक टिकोमा' या नावांनीही ओळखलं जातं.
गेल्या वर्षी झालेल्या वृक्षगणनेनुसार महापालिका क्षेत्रात सुमारे 29 लाख 75 हजार 283 इतके वृक्ष आहेत. यामध्येच सहा हजार 500 पेक्षा अधिक 'बसंत रानी' वृक्षांचाही समावेश आहे.
या झाडांमध्ये 'बसंत रानी' या प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे. सुमारे 25 ते 30 फूट उंच असणाऱ्या या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. मात्र यावर्षी वसंत ऋतू सुरु होण्यापूर्वीच ही झाडे फुलांनी बहरली आहेत. फुलांनी डवरलेली 'बसंत रानी' ची झाडं प्रवासी आणि पुष्पप्रेमींचं लक्ष वेधून घेत आहेत.
मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडा नगर ते विक्रोळी भागात 'बसंत' बहार आली आहे. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या दुतर्फा आणि दुभाजकावर पर्यावरण आणि सुशोभिकरणासाठी विविध झाडं लावली आहेत. ही झाडं दरवर्षीप्रमाणे यंदाही बहरली आहेत.