महाराष्ट्र केसरी बाला रफिकचा अनोखा प्रवास
बाला राफिक हा अतिशय गरीब परिस्थितीतून मेहनतीच्या जोरावर या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या घरात विविध कुस्त्या जिंकलेल्या गदा आणि मेडल ठेवायलाही आता जागा शिल्लक नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलडाण्याकडून महाराष्ट्र केसरीमध्ये कुस्ती खेळणारा बाला रफिक शेख करमाळा तालुक्यातील खडकी गावचा. बाला रफिक शेखचा खेळ पाहण्यासाठी खडकी आणि परिसरातून अनेक गाड्या जालन्याला आल्या होत्या.
बाला रफिक शेखच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. त्याला दोन वेळचा खुराकही व्यवस्थित मिळत नव्हता. पण घरातच कुस्ती होती. तीच परंपरा बाला रफिक शेखने कायम ठेवली. त्याने कधीही प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ केला नाही.
गतविजेत्या अभिजीत कटकेला त्याने 11-3 इतक्या गुणफरकाने पराभूत केले आहे. अभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान आहे. असे असतानाही बाला रफिकने त्याच्यावर मात केली.
महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी गाठण्याची ही अभिजीतची तिसरी वेळ होती. माती विभागातून बाला रफिकनं रत्नागिरीच्या संतोष दोरवडवर मात करत महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक मारली होती.
बाला रफिक सध्या पुण्याच्या हनुमान आखाड्यात गणेश दांगट, गणेश घुले आणि गोरख वांजळे या वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
विजयानंतर आपला किताब हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकरांना समर्पित केला.
बुलडाण्याचा पैलवान बाला रफिक शेख यंदाच्या महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -