अहमदनगरमध्ये विराट बहुजन क्रांती मोर्चा

कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी शहर आणि परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय मार्गाची वाहतूक बाह्यवळण मार्गाने वळवण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिर्डीतील सागर शेजवळ, खर्डातील नितीन आगे यांच्या कुटुंबीयांनी मोर्चात सहभाग नोंदवला आहे.

या मोर्चात एससी, एसटी, ओबीसींसह 50 पेक्षा जास्त संघटनांचा सहभाग आहे.
ऑक्टोबर हिट असूनही भर उन्हात मोठ्या संख्येने नागरिक मोर्चाला उपस्थित आहेत.
कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, बहुजन समाजातील नेत्यांवरील आकसातून होणारी कारवाई थांबव, मुस्लीम समाजाला आरक्षण द्या, ख्रिश्चन समाज आणि चर्चवरील हल्लेखोरांवर कडक कारवाई करा, यांसह इतर वीस मागण्या करण्यात आल्या आहेत.
'एकच गर्व, बहुजन सर्व' असा नारा मोर्चात दिला जात आहे.
या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे हा मूक मोर्चा नाही.
सुरुवातीला महिला आणि नंतर पुरुष असा मोर्चाचा क्रम आहे.
वाडिया पार्क निळे, पिवळे झेंड्यांनी सजला आहे.
वाडिया पार्कमध्ये भाषणं झाल्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला.
अहमदनगरमध्ये बहुजन क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -