सेटवर मजा-मस्ती, बाहुबलीचे पडद्यामागील फोटो
कटप्पा आणि बाहुबलीचे काही विनोदी प्रसंगही या सिनेमात पाहायला मिळाले. हा फोटो त्याच सीनच्या शूटिंगदरम्यानचा आहे. (Photo: Arka Mediaworks)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सिनेमातील सर्वच पात्रांची वेशभूषा- पोषाख इतका जाडजूड होता की त्यामुळे शूटींगदरम्यान सर्वच कलाकार घामाघूम होऊन जात. गर्मीपासून दिलासा मिळावा म्हणून असे काही प्रयत्न केले जात. (Photo: Arka Mediaworks)
या सिनेमात भल्लाल देवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबत्ती आणि बाहुबली अर्थात प्रभास हे दिग्दर्शक राजमौली यांच्यासोबतही मजा-मस्तीत व्यस्त असायचे (Photo: Arka Mediaworks)
‘बाहुबली 2’ चित्रपटाने देशविदेशातील सिनेरसिकांनाही वेड लावत 10 दिवसात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्या आठवड्यात ‘बाहुबली 2’ ने 860 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ‘बाहुबली 2’ हा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे. दहा दिवसांमध्ये 1000 रुपयांचा गल्ला ‘बाहुबली 2’ नं जमवला आहे. हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल, मात्र शूटिंगदरम्यान सेटवर काय-काय घडलं, त्याबाबतचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. (Photo: Arka Mediaworks)
अभिनेत्री रम्या कृष्णनने या सिनेमात शिवगामीची भूमिका साकारली आहे. बाहुबली सिनेमातील शिवगामीची भूमिका कोणीही विसरु शकणार नाही. प्रत्यक्ष सिनेमात धीरगंभीर दिसणारी शिवगामी शूटिंगदरम्यान जोक्स आणि विनोदात रमून जात होती. (Photo: Arka Mediaworks)
सिनेमाचं शूटिंग सुरु होतं त्यावेळी होळीचाही सण आला होता. त्यादरम्यान सेटवरच क्रू मेंबर्सनी होळी साजरी केली (Photo: Arka Mediaworks)
या सिनेमाच्या शूटिंगसाठी सुमारे 5 वर्षे लागली. अभिनेता प्रभास प्रत्येकवेळी सेटवर असायचा. भले त्याचा सीन असो वा नसो, तो सेटवर हजेरी लावायचाच. (Photo: Arka Mediaworks)
देवसेना तलवारबाजी करत असते, त्याचवेळी बाहुबलीची नजर तिच्यावर पडते आणि तो अक्षरश: प्रेमात पडतो. हा फोटो त्याचवेळचा आहे, ज्यामध्ये दिग्दर्शक राजमौली हे अनुष्का आणि प्रभासला त्याच सीनबद्दल समजावून सांगत होते. (Photo: Arka Mediaworks)
हा सीन तुमच्या लक्षात असेल. भल्लाल देव पहिल्यांदा देवसेना आणि बाहुबली यांना दुर्बिणीतून पाहतो, त्यावेळी भल्लाल देवच्या मुलाचं शीर त्यांच्या हातात असतं. तोच सीन समजावून सांगताना दिग्दर्शक राजमौली. (Photo: Arka Mediaworks)
पडद्यावर भल्लाल देव जितका धीरगंभीर दिसतो, त्याच्या अगदी उलट तो सेटवर पाहायला मिळाला. शूटिंगदरम्यान राणा दग्गुबत्ती सेटवरचं वातावरण हलकं-फुलकं ठेवत असे. (Photo: Arka Mediaworks)
शिवगामी आणि देवसेना अर्थात रम्म्या आणि अनुष्का शेट्टी सेटवर गप्पा-गोष्टी करताना. (Photo: Arka Mediaworks)
या सिनेमातील एका गाण्यासाठी प्रभासने हातावर टॅटू काढला होता. हा त्याचवेळचा फोटो आहे. (Photo: Arka Mediaworks)
अभिनेत्री अनुष्का शेट्टीने या सिनेमात देवसेनाची भूमिका साकारली आहे. देवसेना आणि बाहुबली हे तिरंदाजी करताना जो सीन आहे, तो कसा शूट केला असेल, त्याचा अंदाज या कॅमेरा सेटअप वरुन बांधू शकता. या सीनसाठी अशाप्रकारच्या कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -