कुठे प्रभासवर दुग्धाभिषेक, तर कुठे फटाक्यांचा धूर, देशभरात बाहुबालीचा जल्लोष

पिंपरीत रांगा तिकडे पिंपरी-चिंचवडमध्येही बाहुबली-2 पाहण्यासाठी चाहत्यांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. लहान थोरांसह सर्वच वयोगटातील प्रेक्षकांमध्ये बाहुबली पाहण्याची उत्सुकता दिसली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

नाशिकमध्ये बाहुबली टी शर्ट - बाहुबली पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमा गृहात मोठी गर्दी केली आहे. नाशिकमध्ये बाहुबलीच्या चाहत्यांनी बाहुबलीचे शर्ट घालून सिनेमा गृहात हजेरी लावली..
हैदराबादेत प्रभासच्या पोस्टरला दुग्धाभिषेक हैद्राबादमध्ये बाहुबली सिनेमाच्या चाहत्यांनी बाहुबली-२ अनोखं स्वागत केलं.. बाहुबली चित्रपटाचा नायक प्रभासच्या पोस्टरला चाहत्यांनी चक्क दुधाचा अभिषेक घातला. प्रभासच्या पोस्टरला मोठा हार घालत, बाहुबली-२चं जंगी स्वागत केलं.
चंद्रपुरात जल्लोष राज्याच्या कान्याकोपऱ्यात बाहुबलीला जोरदार प्रतिसाद मिळतोय. चंद्रपुरातही चाहत्यांनी ढोल ताशाच्या गजरात बाहुबली-2चं स्वागत करण्यात आलं.
बाहुबली पाहून आलेल्या सर्वच जण पैसा वसूल अशी प्रतिक्रिया देत आहेत. बाहुबली -2चं पहिल्या दिवसांचं बुकिंग सगळीकडे हाऊसफुल्ल झालं. अनेक थिएटर्समध्ये पंधराशेपेक्षा अधिक किंमतीला तिकीट विक्री झाली.
मोस्ट अवेटेड चित्रपट ‘बाहुबली द कन्क्लुजन’ अर्थात बाहुलबलीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. देशभरात या चित्रपटाचा चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -