Auto Expo 2020 | स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी मारुतीकडून 'Vitara Brezza' मध्ये आमुलाग्र बदल
सोमनाथ चॅटर्जी, एबीपी माझा | 07 Feb 2020 02:39 PM (IST)
1
ही कार पेट्रोल इंजिवर असली तरी डिझेल इंजिन करण्याचाही पर्याय कंपनी देणार आहे.
2
नवीन ब्रेझामध्ये फेसलिफ्टच्या रूपात बदल केला असून नवीन लुक इंटरनॅशनल विटारा एसयूव्हीसारखाच आहे. नवीन ब्रेझा स्पोर्टी लुकसह वायडर एअरडॅममुळे एकदम दबंग दिसतेय.
3
ही कार ऑटोमॅटिकसह स्मार्ट हायब्रिड देखील आहे. यात एक लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आलाय. ऑटोमॅटिक हे मॅन्युअलपेक्षा अधिक मायलेज देते.
4
दुसरी मोठी बातमी म्हणजे BS6 1.5L पेट्रोल इंजिन आता ब्रेझा लाइन अपमधील एकमेव मोटर इंजिन असणार आहे.
5
ब्रेझाच्या दोन्ही बाजूला मिश्र धातूची फिनीशिंग दिल्याने प्रीमियम लूक आलाय. तर मागच्या बाजूला पूर्वीच्या एलईडीमध्ये सौम्य बदल केल्याने ते देखील उठून दिसतंय.
6
गाडीतील इंटीरिअर डिझाईनमध्ये जास्त बदल करण्यात आलेले नाही. पण, स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम यात तुम्हाला मिळणार आहे.