Auto Expo 2020 | ऑटो एक्स्पोमध्ये KIA Sonet सादर, Venue, Brezza ला टक्कर देणार!
लॉन्चआधी Kia Sonet च्या किंमतीबाबत कोणतंही भाकित करणं कठीण आहे. परंतु कंपनी ही एसयूव्ही सात लाखांपासून 11 लाख रुपयांपर्यंत लॉन्च करु शकते.
कंपनी या एसयूव्हीमध्ये प्रीमियम फीचर्स जसे की, यूव्हीओ कनेक्टिव्हिटी, इनबिल्ट सिमकार्ड, 10.25 इंच टचस्क्रीन आणि Boseचा साऊंड सिस्टम सामील करण्याची शक्यता आहे.
प्रतिस्पर्धी गाड्यांच्या तुलनेत Kia Sonet चे टायर मोठे आहेत.
डिझाईन पाहता ही 4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. यावर Kia चा ट्रेडमार्क 'टायगर नोज' ग्रिल आहेत. यात LED DRLs लूक आहे, जो अनेकांना फार पसंती पडत आहे.
Hyundai Venue, Maruti Brezza, Mahindra XUV300 plus, The Ford EcoSport आणि नुकतीच मार्केटमध्ये लॉन्च झालेल्या Tata Nexon यांसारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाड्यांना टक्कर देण्यासाठी ही नवीकोरी कार सज्ज झाली आहे.
दक्षिण कोरियाची वाहन निर्मिती करणारी प्रमुख कंपनी Kia Motors ने Auto Expo मध्ये नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet सादर केली आहे.