Auto Expo 2020 : नवी टेक्नॉलॉजी, जबरदस्त फिचर्स; ऑटो एक्सपोमध्ये एकापेक्षा एक कार
Volkswagen I.D. Crozz: ऑटो एक्सपो 2020 मध्ये वोक्सवॅगनने आपली इलेक्ट्रिक कॉन्सेप्टवर बेस्ट एसयूव्ही सादर करण्यात आली. ही एक इलेक्ट्रिक लग्जरी SUV आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTata Sierra: टाटाची सिएरा ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली आहे. टाटाने EV SUV मॉडल मध्ये सादर केलं. जर तुम्ही ऑटो एक्सपोमध्ये जाणार असाल तर तुम्हाला टाटाची ही कार पाहणं गरजेचं आहे.
Tata HBX: ऑटो एक्सपो 2020 मध्ये टाटाची HBX दाखवण्यात आली आहे. हीदेखील कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॉडेल आहे. ऑटो एक्सपोमध्ये ही पहिल्यांदा दाखवण्यात आली होती. पुढच्याच महिन्यात ही गाडी भारतात लॉन्च होणार आहे.
Suzuki Jimny: ऑटो एक्सपो 2020 मध्ये सुझुकी जिम्नी सादर करण्यात आली असून लवकरच ही कार भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. ही कार जिप्सी मॉडलमधील आहे.
Hyundai Creta: ही कार ऑटो एक्सपोमध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली. नवीन क्रेटा पुढच्या काही महिन्यांमध्ये भारतात लॉन्च केली जाऊ शकते. ही कार पेट्रोल आणि डिझेस मॉडल्समध्ये लॉन्च करण्यात येईल. आधीच्या क्रेटा कारचं हे अपडेटेड वर्जन आहे. त्याचसोबत यामध्ये फिचर्सही जास्त आहेत.
Mahindra Funster: महिंद्राने क्रेजी फनस्टरला ऑटो एक्सपोमध्ये दाखवलं होतं. ही एक स्पोर्ट्स कार आहे. जिचा लूक क्लासी असण्यासोबतच फिचर्सही अत्याधुनिक आहेत.
Kia Sonet: किआ कंपनीची सेल्टोसच्या चांगल्या परफॉर्मन्स नंतर ऑटो एक्सपोमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही दाखवण्यात आली आहे. जिचं नाव सोनेट आहे. लवकरच ही कार भारतात लॉन्च करण्यात येणार आहे.
Haval SUVs: जर तुम्ही ऑटो एक्सपोमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर Haval SUVs नक्की पाहा. ही एक इलेक्ट्रिक कार आहे. लवकरच ही कार भारतात लॉन्च करण्यात येणार आहे.
Maruti Futuro-e: ऑटो एक्सपोमध्ये मारुती कंपनीचं Futuro-e मॉडेल सादर करण्यात आलं. लवकरच भारतात ही गाडी लॉन्च करण्यात येणार आहे. या कारमध्ये अनेक लेटेस्ट फिचर्स देण्यात आले आहेत.
Mercedes-AMG GT: ऑटो एक्सपो 2020 मध्ये मर्सिडीजच्या वतीने मर्सिडीज-AMG GT सादर करण्यात आली आहे. ही प्रीमियम कार दिसायला जेवढी आकर्षक आहे तेवढेच अत्याधुनिक या कारचे फिचर्स आहेत. त्याचबरोबर एक्सपो 2020मध्ये सादर करण्यात आलेली ही सर्वात महागडी कार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -