कोपर्डीच्या निषेधार्थ औरंगाबादेत विराट मोर्चा
कोपर्डीच्या निषेधार्थ औरंगाबादेत विशाल मोर्चा, लाखोंचा जनसमुदाय (सोशल मीडियातील व्हायरल फोटो)
कोपर्डीच्या निषेधार्थ औरंगाबादेत विशाल मोर्चा (सोशल मीडियातील व्हायरल फोटो)
शहरातल्या सर्व मराठा संघटना या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. लाखोंच्या जमावानं विभागीय आयुक्तालयाला धडक देत याप्रकरणी त्वरित कारवाईची मागणी केली. (सोशल मीडियातील व्हायरल फोटो)
कोपर्डीतल्या घटनेला एक महिना उलटत आला. तरी याप्रकरणी अंतिम आरोपपत्र दाखल झालेलं नाही. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून हा मोर्चा काढण्यात आला. (सोशल मीडियातील व्हायरल फोटो)
शहरातल्या क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. (सोशल मीडियातील व्हायरल फोटो)
अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत औरंगाबादमध्ये मराठा समाजानं मूक मोर्चा काढला. (फोटो सौजन्य: शकील खान)