हिटलरच्या टेलिफोनचा लिलाव, किंमत तब्बल....
मेरीलँडच्या कंपनीने टेलिफोनसोबत जवळपास हजारो वस्तूंचा लिलाव केला. यामध्ये चिनी मातीपासून बनलेल्या अल्सेशियन कुत्र्याच्या शिल्पाचाही समावेश आहे. या शिल्पाचा 14 हजार 300 डॉलरना लिलाव झाला. लिलावातील दोन्ही विजेत्यांनी टेलिफोनच्या माध्यमातूनच बोली लावली.
टेलिफोनच्या सुरुवातीला 1 लाख डॉलर बोली लावण्यात आली होती.
हिटलरच्या टेलिफोनचा लिलाव करणाऱ्या 'अलेक्झेंडर हिस्टोरिकल ऑक्शन'ने हा टेलिफोन खरेदी करणाऱ्याचं नाव जाहीर केलं नाही.
बॅकलाईटपासून बनलेल्या काळ्या रंगाच्या टेलिफोनला नंतरच्या काळात गडद लाल रंगाने रंगवण्यात आले. शिवाय, टेलिफोनवर 'हिटलर' असं नावही कोरण्यात आले. हिटलरच्या पराभवानंतर 1945 साली बर्लिनमधील एका बंकरमध्ये हा टेलिफोन मिळाला होता.
अमेरिकेत एका लिलावात अॅडॉल्फ हिटलरच्या वैयक्तिक टेलिफोनचा लिलाव करण्यात आला. 2 लाख 43 हजार डॉलरना लिलाव झाला. (1 कोटी 60 लाख 83 हजार 6000 रुपये) हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात याच टेलिफोनद्वारे आदेश दिले होते.