तुळजाभवानी मंदीरात नेत्रदिपक आकर्षक विद्युत रोषणाई
यंदा राजमाता जिजाऊ राजे शहाजी महाद्वार, गोमुख कुंड निंबाळकर दरवाजा, मुखगर्भगृह आणि भवानी शंकर तसेच होमकुंड या तिन्ही शिखरावर आणि मंदीर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यंदाचा शारदीय नवरात्रोत्सवात ही नेत्रदिपक आकर्षक विद्युत रोषणाई भक्तांसाठी आकर्षक ठरणार आहे.
तब्बल 25 हजार बल्बरुपी दिव्यांनी डिजिटल लाईटींगने यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव उजळून निघणार आहे.
गेल्य़ा सहा वर्षापासून श्रीतुळजाभवानी मंदिरात केली जाणारी विद्युत रोषणाई भक्तांन साठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर तुळजापूरच्या कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात लगबग सुरु झाली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासह परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पुणे येथील संजय टोळगे व उंडाळे यांनी श्रध्देपोटी ही विद्युत रोषणाई केली आहे. शनिवारी संघ्याकाळी फटाक्याचा अतिषबाजीत या विद्युत रोषणाईचा शुभारंभ करण्यात आला.