सलमान खानचा बॉडीगार्ड शिवसेनेत, शेराच्या हाती शिवबंधन
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2019 12:44 PM (IST)
1
विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शेरा आदित्य ठाकरे यांच्यासोबत प्रचारात उतरला.
2
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित 'मातोश्री'वर शेराने शिवबंधन बांधलं.
3
मागील 22 वर्षांपासून शेरा सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे.
4
सलमान खानचा जवळचा आणि अत्यंत विश्वासू म्हणून शेराची ओळख आहे.
5
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा विश्वासू बॉडीगार्ड गुरमीत सिंह म्हणजेच शेराने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
6
शेराच्या शिवसेना प्रवेशाची माहिती रात्री उशिरा पक्षाच्या ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली.
7
यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेराच्या हाती शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केलं.