आशिया चषकाच्या फायनलमधील काही अनोखे विक्रम
बांगलादेश आणि भारत आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वेळा फायनलमध्ये भिडले आहेत. या सर्व सामन्यात बांगलादेशला पराभव स्वीकारावा लागला आहे.
रोहित शर्माने कर्णधार म्हणून पहिल्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. याआधी रोहित शर्माने आयपीएलचं जेतेपद आणि चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या नेतृत्वात जिंकली आहे.
आशिया चषकाच्या फायनलमध्ये लिटन दासने 121 धावांची खेळी केली. भारताविरुद्ध केलेल्या कोणत्याही बांगलादेशच्या खेळाडूची सर्वाधिक धावसंख्या आहे.
फायनलमध्ये बांगलादेशला पराभूत करत भारतानं सातव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारतानं बांगलादेशला दुसऱ्यांदा पराभूत केलं आहे.
एखाद्या संघानं स्पर्धेची फायनल अंतिम चेंडूवर जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. कालच्या सामन्यात आणि पाकिस्तानने 1986च्या शारजाहच्या फायनलमध्ये भारताला शेवटच्या चेंडूवर हरवलं होतं.
भारतानं पाचव्यांदा एखाद्या स्पर्धेची फायनल 50व्या षटकात जिंकली आहे आणि हा एक विक्रम आहे. या यादीत पाकिस्तान (2) दुसऱ्या स्थानावर आहे.