Asia Cup 2018 : आशिया चषकात भारत सर्वाधिक यशस्वी संघ
भारतीय संघाने आजवर 6 वेळा आशिया चषक जिंकला आहे. 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 मध्ये आशिया चषकावर कब्जा केला आहे.
आशिया चषकाला युएईच्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आजपासून सुरुवात होत आहे. 15 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत आशिया चषक स्पर्धा रंगणार आहे.
पाकिस्ताननं केवळ दोनदा 2000 आणि 2012मध्ये विजेतेपद पटकावलं आहे.
भारतानंतर श्रीलंका आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008 आणि 2014 मध्ये आशिया चषकावर आपलं नाव कोरलं.
आशिया चषकमध्ये भारत सर्वाधिक यशस्वी संघ आहे. भारताने सर्वाधिक वेळा आशिया चषकाच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.
बांगलादेशला पराभूत करत 2016च्या आशिया चषकाचं विजेतेपद भारतानं पटकालं होतं. त्यामुळे टीम इंडियाच्या शिलेदारांसमोर गतविजेतेपदाचा लौकिक कायम राखण्याचं आव्हान असेल.
1984मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताने पहिल्याच वर्षी या स्पर्धेच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं.
आशिया चषकात भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग हे संघ सहभागी होणार आहे. भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँगचा गट 'अ'मध्ये सहभागी आहेत. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा गट 'ब'मध्ये सहभागी आहे.