आर. अश्विनचा भीमपराक्रम, विश्वविक्रमाला गवसणी
अश्विननं फक्त 88 डावांमध्ये हा विक्रम रचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतो आज मुरलीधरनच्या देखील पुढं निघून गेला आहे. मुरलीधरननं 100 डावात 25 वेळा 5 बळी घेतले होते.
अश्विननं आपल्या कारकीर्दीत 47 कसोटीत एकाच डावात 5 बळी घेतले आहेत. त्याच्यानंतर हेडली यांचं नाव येतं. त्यांनी 62 कसोटीत ही किमया केली होती. तर एवढ्या कमी कसोटीत मुरलीधरनही हा विक्रम करु शकला नव्हता.
दरम्यान, अश्विननं एक मोठा विक्रमही स्वत:च्या नावावर केला आहे. सर्वात कमी सामन्यात आणि कमी डावात अश्विननं तब्बल 25 वेळा 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 188 धावांची गरज होती. पण ऑस्ट्रेलिया 35.4 षटकात केवळ 112 धावाच करु शकली.
बंगळुरु कसोटीत फिरकीपटून आर अश्विननं सहा गडी बाद करुन टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अश्विनच्या फिरकीपुढं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. भारतानं कांगारुंचा 75 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-1नं बरोबरी साधली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -