वारी पंढरीची | माऊलींची पालखी खंडेरायाच्या भेटीला, जेजुरीत भंडाऱ्याच्या रंगात रंगले वारकरी
हाच क्षण अनुभवण्यासाठी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी यावेळी जेजुरी पंचक्रोशीतील गावकरी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
जेजुरीमध्ये पोहोचणाऱ्या माऊलीच्या पालखीवरती याठिकाणी भंडारा उधळला
माऊलींची पालखी बरोबर गडावरच्या मंदिरासमोर खाली येते. त्यावेळी त्या पालखीवर भंडारा उधळला जातो आणि माऊलींना पिवळं केलं जातं.
जेजुरीत पोहोचणाऱ्या माऊलींच्या पालखीचं दोन वेळा स्वागत केलं जातं. स्वागताचा पहिला मान खंडोबा देवस्थानचा तर दुसरा स्वागत जेजुरी नगरपालिकेचा असतो.
माऊलीची पालखीतील वारकऱ्यांना अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंड खंडेरायाचं दर्शन मिळते. येथे शैव आणि वैष्णव भक्तांचा मिलाफ होतो आणि 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष होतो.
जेजुरीला आल्यानंतर वारकऱ्यांनी गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतलं. यावेळी भंडारा उधळत 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष केला.
आळंदीपासून पंढरपूर पर्यंत 17 मुक्काम करून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस पर्वणी असतो.
सासवडहून सकाळी निघालेल्या माऊलीची पालखीने आज जेजुरीसाठी प्रस्थान केले. जेजुरीमध्ये शैव आणि वैष्णव भक्तांचा मिलाप होतो.