विठुरायाच्या दर्शनाला चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा, 15 लाखांहून अधिक वारकरी पंढरीत

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
माउलीच्या दिंडीने पंढरपुरात प्रवेश केला त्यावेळचे विलोभनीय दृश्य

या पूजेत वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून बसण्याचा मान लातूरमधील अहमदपूरचे भाविक विठ्ठल चव्हाण आणि प्रयागाबाई चव्हाण या दाम्पत्याला मिळाला. गेली 20 वर्षे हे दाम्पत्य वारी करत आहे.
शासनाच्या पर्यावरणाची वारी , पंढरीच्या दारी या कार्यक्रमाचा समारोप आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरमधील विश्रामगृहावर पार पडला. यावेळी या संपूर्ण पालखी मार्गावर स्वच्छतेचे अभियान चालवणाऱ्या दिंडीकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. स्वच्छतेची गीते सादर केल्यानंतर वारकरी अभंग सुरु होताच मुख्यमंत्र्यांनी या इतर वारकऱ्यांसमवेत हातात टाळ घेत भजनात रंगून गेले तर त्यांच्या पत्नी अमृता यांनी डोक्यावर तुळसी वृंदावन घेत महिला वारकऱ्यांमध्ये सामील झाल्या.
तासनतास रांगेत उभे राहात वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी रांग केलीय.
चंद्रभागेत स्नान करुन विठुराया चरणी साकडे घालताना वारकरी.
आषाढी एकादशीला पंढरीत लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली.
आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाची शासकीय महापूजा पंढरपुरात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा पार पडली.
विठ्ठलाच्या ओढीने महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून जवळपास 15 लाख वारकरी भाविक विठूरायाच्या पंढरीनगरीमध्ये दाखल झाले आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत वैष्णवांचा मेळा भरला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -