न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी अर्जुन तेंडुलकरची कोहलीला गोलंदाजी
टीम इंडियासोबत अर्जुनची गोलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी महिला विश्वचषकादरम्यान, अर्जुनने इंग्लंडमध्ये भारतीय महिला खेळाडूंसोबत गोलंदाजीचा सराव केला होता.
अर्जुनने सर्वात आधी शिखर धवनला मग कर्णधार विराट कोहलीला गोलंदाजी केली. त्याशिवाय त्याने अजिंक्य रहाणे आणि केदार जाधव यांच्यासोबतही गोलंदाजी सराव केला. अर्जुन तेंडुलकर हा डाव्या हाताने गोलंदाजी करणारा मध्यमगती गोलंदाज आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया मुंबईतील वानखेडे मैदानात सराव करत आहे.
याचवेळी अर्जुन तेंडुलकरने विराट कोहली आणि टीम इंडियातील खेळाडूंना गोलंदाजी केली.
18 वर्षीय अर्जुन तेंडुलकरची गोलंदाजी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीही पाहिली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर क्रिकेटचे धडे गिरवत आहे.