जस्टिन बिबरचा क्रेझी फॅन, अर्जुन तेंडुलकर कुबड्या घेऊन कॉन्सर्टला!
जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टसाठी चाहत्यांनी अक्षरश: गर्दी केली होती. काही जण तर आदल्या दिवशीपासून स्टेडियम परिसरात तळ ठोकून होत. तर दिवसभरात 50 चाहते बेशुद्धही झाले होते.
अर्जुलच्या पायाला नेमकी काय दुखापत झालीय, हे कळू शकलेलं नाही, मात्र या परिस्थितीतीतही तो जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टला नवी मुंबईत उपस्थित होता.
चालता येत नसूनही, कुबड्या घेऊन अर्जुनने जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टला हजेरी लावली. त्यावरु तो बिबरचा किती फॅन आहे, याचा अंदाज लावता येईल.
अर्जुन तेंडुलकरच्या पायाला दुखापत झाली आहे. मात्र तरीही तो कुबड्या घेऊन या कार्यक्रमासाठी हजर राहिला.
क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरचे चाहते जगभरात आहेत. मात्र सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पॉप गायक जस्टिन बिबरचा क्रेझी फॅन आहे.
जस्टिन बिबरची म्युझिक कॉन्सर्ट बुधवारी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडली. सिनेसृष्टीसह सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी सचिनचा मुलगाही उपस्थित होता.