iPhone 7 चे फीचर्स लीक, तब्बल 256 GB स्टोरेज
iPhone 7 मध्ये 21 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा आणि मल्टी लेन्स फंक्शन असणार आहे. अॅपल कंपनी यावर्षी सप्टेंबर महिन्यात iPhone 7 चे दोन्हीही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टोरेजसह या फोनमध्ये रॅम देखील जबरदस्त असेल. iPhone 7 मध्ये 2 GB, तर iPhone 7 प्लसमध्ये 3 GB असेल, असं बोललं जात आहे.
अॅपलच्या iPhone 7 या स्मार्टफोनविषयी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या iPhone 7 चे काही फिचर्स समोर आले आहेत. त्यामध्ये iPhone 7 चं स्टोरेज हे अॅपलच्या इतिहासातील सर्वात मोठं स्टोरेज आहे.
iPhone 7 मध्ये तब्बल 256 GB स्टोरेज आहे, अशी माहिती समोर आली आहे. अॅपलने आतापर्यंत एवढ्या स्टोरेजचा एकही फोन बाजारात आणलेला नाही.
iPhone 7 मध्ये 16 GB, 64 GB आणि 128 GB असे मॉडल असणार आहेत. तर याचं अपग्रेडेड व्हर्जन iPhone 7 प्लसमध्ये 32 GB, 128 GB आणि 256 GB स्टोरेज असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -