लग्नाबाबत अनुष्का शर्मा म्हणते की...
दरम्यान, प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राच्या बर्थडे पार्टीत विराट आणि अनुष्कानं एकत्र हजेरी लावली होती.
'महिला आता आर्थिकदृष्ट्या सबळ होत आहेत. त्यामुळे महिला आपलं आयुष्य स्वतंत्रपणे जगू शकतात.'
'मी फारच सामान्य व्यक्ती आहे. एकदाच लग्न करणं या गोष्टीवर मी विश्वास ठेवणारी मुलगी आहे.'
'मी एका साधारण व्यक्तीप्रमाणे पुढेही आपल्या गोष्टी सुरु ठेऊ इच्छिते (लग्नानंतरही). माझ्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे.'
'मला मान्य आहे की, गोष्टी आता बदलत आहेत. अनेक अभिनेत्री या लग्न आणि मुलांच्या जन्मानंतरही त्याच उर्जेनं काम करत आहेत.' असं अनुष्का म्हणाली.
एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात अनुष्का म्हणाली की, 'लग्न नक्कीच करेन. पण केव्हा करेन हे माहीत नाही. याबाबत सध्या मी विचार केलेला नाही. मी आयुष्यात सर्व गोष्टी अगदी सामान्यपणे करते. लग्न देखील तसंच होईल.'
28 वर्षीय अनुष्का सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च शिखरावर आहे. आपण सध्या लग्नाचा विचार करत नसल्याचं अनुष्काचं म्हणणं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं लग्नाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. 'एखाद्या सामान्य मुलीप्रमाणं आपल्याला देखील लग्न करायचं आहे. पण लग्नाच्या बंधनात आपल्याला एवढ्यात अडकायचं नाही.' असं अनुष्का म्हणाली.