विराट कोहलीबद्दल दिग्गज क्रिकेटपटूंना काय वाटतं?
जवळपास दीड वर्ष टीम इंडियाची संचालक पदाची धूरा सांभाळणारे रवी शास्त्री म्हणाले की, ''विराट सध्या 27 वर्षांचा आहे. मात्र, त्याने आयुष्यात सर्व काही मिळवलं आहे. मला त्याच्यासोबत ड्रेसिंग रुममध्ये वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्याच्या स्वभावाने मला सर्वाधिक प्रभावित केलं. तो आपल्या कामाप्रति अतिशय प्रामाणिक आहे. तो कोणत्याही प्रकारची कारणे देत नाही.''
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनिल कुंबळे म्हणाला की, ''गेल्या काही वर्षांमध्ये कोहलीमध्ये जे बदल झाले आहेत, त्याचे संपूर्ण श्रेय त्यालाच जाते. तो केवळ स्वत:लाच नाही, तर संपूर्ण टीमलाच तयार करतो. त्याने खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात इतर खेळाडूंसाठी काही मानदंड प्रस्थापित केले आहेत. तो आता एक महान खेळाडू बनला असून आता तो यशाच्या कोणत्या शिखरापर्यंत पोहचेल हे वेळच ठरवेल.''
टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही विराटची मुक्तकंठाने स्तुती केली. तो म्हणाला की, ''मी जेव्हा दिल्लीसाठी खेळत होतो, तेव्हा माझा सहकारी प्रदीप सांगवानने मला एका मुलाविषयी माहिती दिली. संगवान म्हणाले की, एका मुलगा कमालीची फलंदाजी करतो. पणनंतर मी जेव्हा त्याला प्रत्यक्ष फलंदाजी करताना पाहिले, तेव्हा या मुलामध्ये एक वेगळीच ऊर्जा असल्याचं जाणवलं आणि हा खूपच पुढे जाईल.''
यावेळी बोलताना भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी टीम इंडियाचा कसोटी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीवर स्तुतीसुमनं उधळली. यात टीम इंडियाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेने विराटला महान क्रिकेटपटू संबोधित केलं.
विराट कोहलीचं व्यक्तिमत्त्व उलगडून सांगणारं ज्येष्ठ पत्रकार विजय लोकपल्ली लिखित 'ड्रिव्हन' या पुस्तकाचं काल दिल्लीत प्रकाशन झालं. या कार्यक्रमावेळी विराट कोहलीसोबत कपिल देव, भारतीय संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग, टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री, कोहलीचा सहकारी आशीष नेहरा, महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा आणि कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
कोहलीचे कोच राजकुमार शर्मा म्हणाले की, ''त्याला लहानपणापासूनच आव्हानांचा सामना करण्याची सवय आहे. तो कायम आव्हानांच्या शोधात असतो. तसेच त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे.''
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -